कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई
कराड : कराड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार यास पिस्टलसह अटक करण्यात आली आहे. कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली आहे. प्रफुल्ल निवृत्ती निकम वय 38 वर्ष, रा. साकुर्डी, ता.कराड जि. सातारा, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधिक्षक सातारा यांच्या आदेशाने अवैद्य शस्त्रे पकडण्याबाबत मोहीम चालू असताना ही कारवाई करण्याकामी पोनि खोबरे यांचे नियम माहितीनुसार स.पो.नि. सखाराम बिराजदार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अमलदार सज्जन जगताप, उत्तम कोळी, सचिन निकम यांनी साकुर्डी फाटा पेट्रोल पंपाजवळ कराड तालुका पोलीस ठाणे अभिलेखावरील आरोपीबाबत गोपनिय माहिती काढून तो साकुर्डी फाटा येथे असताना त्याच्याकडे विनापरवाना पिस्टल असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्या नंतर पोलीस स्टाफच्या मदतीने साकुर्डी फाटा येथे सापळारचून फुल्ल निकम पिस्टलसह अटक करण्यात आले. अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मालमत्तेविरुध्द कराड तालुका पोलीस स्टेशन तसेच पाटण पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल तसेच अपर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत पाटील, सो कराड व पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, सो कराड तालुका पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कराड तालुका पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स.पो.नि. सखाराम बिराजदार, पोलीस अमलदार सज्जन जगताप, उत्तम कोळी, सचिन निकम यांनी केली असुन पुढील तपास सपोनि बिराजदार हे करीत आहेत.






















