सातारा : सातारा पालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडे आदराने पाहिले जातात त्या सौ. माधवी संजीव कदम. सातारा ही आपली जन्मभूमी नसली तरी ती कर्मभूमी आहे आणि नगरपालिका ही मातृसंस्था आहे, येथील सर्वसामान्यांची सेवा करण्याचे भाग्य लाभले यापेक्षा कोणतीच गोष्ट मोठी नाही. या विचारांच्या खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सातारा नगरपालिकेमध्ये त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत नॅशनल रुलर डेव्हलपमेंट व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी बेळगाव या संस्थेमार्फत त्यांना आंतरराज्य गौरव पुरस्काराची घोषणा केली आहे.
कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा अशा तीन राज्यांमधून सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, बांधकाम व इंजीनियरिंग क्षेत्रामध्ये महनीय व कार्यकतृत्व सिद्ध केलेल्या विशेष व्यक्तींना प्रत्येक वर्षी असा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. या पुरस्काराची घोषणा संस्थेचे कार्यवाहक माजी खासदार अमरसिंह पाटील, माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, माजी खासदार सुधीर सावंत यांनी केली या पुरस्काराचे वितरण दिनांक 5 सप्टेंबर 2019 रोजी चिकोडी बेळगाव येथे होणार आहे. सौ.माधवी संजोग कदम यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने सातारच्या शिरेपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. यापूर्वी त्यांना लोकमत मार्फत वुमन आयकॉन्स ऑफ सातारा या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे तसेच महाराष्ट्र जनरल फाउंडेशन मार्फत भास्कर भूषण पुरस्कारासाठी त्यांची निवड झालेली आहे.