
सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची कराड येथे भेट घेऊन शिक्षक बँक व सोसायटीच्या निवडणुका लवकरात लवकर उन्हाळी सुट्टी पूर्वी घ्याव्यात अशी मागणी केली, यावेळी प्रामुख्याने सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे ,जिल्हासरचिटनिस व शिक्षक बँकेचे संचालक किरण यादव,जिल्हाकोषाध्यक्ष मोहनराव सातपुते,शिक्षक बँक संचालक सुभाष शेवाळे,शिक्षक समितीचे कराड तालुकाध्यक्ष अरुण पाटील,खटाव तालुका सरचिटणीस नवनाथ जाधव कार्याध्यक्ष उमेश पाटील, सातारा जिल्हा माजी उपाध्यक्ष संजय नांगरे,शिक्षक सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक अंकुश नांगरे,कराड तालुका सरचिटणीस नारायण सातपुते,कार्याध्यक्ष शशिकांत तोडकर,आदींची उपस्थिती होती,
सहकार मंत्री पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की शिक्षक बँक आणि शिक्षक सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुका कोरोना महामारीमुळे मुदत संपुनही रखडल्या आहेत,या मुदत संपलेल्या निवडणुका चौथ्या टप्प्यात घ्याव्यात अशा सूचना करण्यात आल्या आहेत परंतु अध्याप कोणतीही कार्यवाही सुरू नाही,तेव्हा निवडणुका कधी होणार याविषयी शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे,
प्राथमिक शाळा नुकत्याच सुरू झाल्या आहेत,एक मे नंतर शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागणार आहेत तत्पूर्वी दिनांक 30 एप्रिल अखेर या निवडणूक घेण्यात याव्यात, जून जुलै मध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होते आणि शिक्षक बँक आणि सोसायटीच्या निवडणुका नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच घेतल्या तर विध्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते,तेव्हा 30 एप्रिल अखेर या निवडणूका घेण्यात याव्यात अशी मागणी शिक्षक समितीच्यावतीने करण्यात आली आहे,




















