महाराष्ट्र न्यूजप्रतिनिधी : शहाजीराजे भोसले( कळंब – इंदापूर )
दरवर्षी गौरी – गणपती उत्सव सण हा खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.
त्यातच इंदापूर तालुक्यातील जंक्शन या गावी शहाबुद्दीन करीम शेख व परिशाबी भाभी हे करमाळा तालुक्यात कुरटी या गावी आपल्या नेहमी प्रमाणे शेतात शेतीची मशागत करण्यासाठी गेले आसता त्यांना त्यांच्या शेतात काम करीत असताना त्यांना गौरी चे मुखवटे सापडले होते .
तेव्हा पासून हे मुस्लिम दांपत्य गेली वीस वर्षे ते हिंदू धर्मा प्रमाणे आजही ते दरवर्षी गौरी – गणपती चा सण न चुकता साजरा करीत आहेत . त्यांच्या सून व मोठा मुलगा दाऊद शेख व आप्सना शेख दरवर्षी गौरी गणपती चा सण साजरा करीत असतात . ह्यातुनच हिंदू – मुस्लिम यांचे ऐक्याचा नारा व दर्शन पहावयाला मिळते .