सातारा : राष्ट्रवादीचा परळी ता. सातारा येथे युवा मेळाव्याचा शुभारंभ आज झाला.. परळी खोऱ्यातील युवा नेतृत्व शशिकांत वाईकर यांच्यावर युवा आघाडीचा भार देण्यात आला . युवा मेळाव्यात आ. शशिकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात बोलतांना आता राष्ट्रवादी थांबणार नाही, येणाऱ्या निवडणुकांमध्ये खा. शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ” राष्ट्रवादी पुन्हा चा नारा गाजवून दाखवण्याचा खनखंत्या, आवाजात बोलून दाखवले.
युवा नेतृत्वाचा आवाज म्हणून शशिकांतजी वाईकर यांना साथ द्या. हे युवा नेतृत्व राष्ट्रवादीच्या येत्या उगवणाऱ्या सूर्याचा नवाकाळ म्हणून असेल असे प्रतिपादन केले. तसेच शशिकांतजी वाईकर यांच्यावर पवार साहेबांचा आशीर्वाद आहे, असे बोलून त्यांना सातारा जावळी विधानसभा मतदार संघाची धुरा हाती देऊन अध्यक्षपद देण्यात आले.
मोठ्या प्रमाणावर उपस्थित युवा वर्गाने शशिकांत दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणांच जोरजोराने नाद घुमू लागला. या वेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली. दीपक बापू पवार तसेच राष्ट्रवादीचे नितीन माने, युवा नेते तेजसदादा शिंदे असे अनेक मान्यवर उपस्थित होते. परळी खोऱ्यातील युवा वर्गाची धुरा माझ्यावर सोपवली असून मी, पक्षप्रमुख तसेच आदरणीय नेते खा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या विश्वासास तडा न जाऊ देता, पक्ष्याच्या हिताच्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडू, असे आश्वासनसुद्धा शशिकांतजी वाईकर यांनी आपल्या भाषणातून दिले.
त्याच बरोबर सातारा परळी येथील सुमारे दोनशेहून अधिक भाजप पक्षातील कार्यकर्त्यांनी राजीनामे देऊन, आ. शशिकांत शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला. अशा प्रकारचा मोठा धक्का बाबाराजे गटास बसला असून, आता या राष्ट्रवादीच्या उगवत्या सूर्याला कोणी रोखू शकणार नाही असा इशारा देखील आ.शशिकांतजी शिंदे यांनी दिला.