फलटण : कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर ग्राम सभा आयोजित करण्या संदर्भात राज्यातील काही जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विचारणा केल्यावरून 2 ऑक्टोबर 21 रोजी ग्रामसभा घेण्यात याव्यात अशा आशयाचे परिपत्रक 23 सप्टेंबर रोजी काढण्यात आलेले आहे.
त्यानुसार शासनाने घालून दिलेले निर्बंध पाळून तसेच वेळोवेळी नेहमी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या आधीन राहून ऑनलाइन / ऑफलाइन ग्रामसभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. असे सुहास जाधवर अवर सचिव महाराष्ट्र शासन यांनी एका परिपत्रकाद्वारे सर्व विभागीय आयुक्त तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) सर्व जिल्हा परिषद यांना कळविले आहे.