महाराष्ट्र न्यूज नेटवर्कपुणे, दि. २३ मार्च : शहरातून सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच दक्षिणेकडील कर्नाटकात जाणारा पुणे-सातारा महामार्ग तसेच मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे, पथदिवे बसविण्याचा प्रस्ताव पोलिसांनी मांडला आहे. जुना कात्रज घाट रस्ता तसेच नवीन कात्रज बोगदा रस्ता परिसरातील अपघात आणि खून करून मृतदेह मोकळय़ा जागेत टाकून देण्याच्या घटनांमुळे पोलिसांनी या भागात कॅमेरे बसविण्याची मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नवीन कात्रज बोगदा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास सुरूवातही केली आहे.

जुना कात्रज घाट रस्ता आणि मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत आहे. भरधाव वाहने दुसऱ्या वाहनांना धडक देऊन पसार होतात. या दोन्ही रस्त्यांवर अवजड वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणावर असते. सांगली, सातारा, कोल्हापूर, कर्नाटकाकडे जाणारी वाहने जुना कात्रज घाट आणि बाह्यवळण मार्गाचा वापर करतात. पुणे-मुंबईकडे ये-जा करणारी मालवाहू वाहने तसेच प्रवासी वाहने या मार्गाचा वापर करतात. बाह्यवळण मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत आहे. जुना कात्रज घाट रस्ता सा. बां. विभागाच्या अखत्यारीत आहेत. या भागात वनक्षेत्र आहे. गेल्या काही वर्षांत खून केल्यानंतर मृतदेह मोकळय़ा जागेत टाकण्याचे प्रकारही या भागात वाढीस लागले आहेत. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवीन कात्रज बोगदा आणि जुना कात्रज घाट परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, पथदिवे बसविण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, पथदिवे बसविण्यात आल्यास गंभीर गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढीस लागेल तसेच अपघात करून पसार झालेल्या वाहनचालकांचा शोध घेणे शक्य होईल.

















गांधी शिल्प बाजार"" width="265" height="168">















