महाराष्ट्र न्यूज/कराड प्रतिनिधी
मौजे साकुर्डी येथील नेहरू युवा बाल हनुमान गणेश मंडळातर्फे हिंदू एकतेचे तालुकाध्यक्ष गणेश पाटील यांना कोरोनो योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, कोरोनो काळात त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले, मौजे साकुर्डी येथील नेहरू युवा बाल हनुमान गणेश मंडळ नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असते, यावेळी मंडळातर्फे ग्रामस्थांना अडुळसा काढ्याचे वाटप,तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप,मास्क वाटप,रक्तदान शिबिर यासारखे सामाजिक उपक्रम राबवले गेले
यावेळी तहसीलदार अमरदिप वाकडे साहेब, कराड तालुका पोलीस निरीक्षक श्री किशोर धुमाळ साहेब,विभागाचे जेष्ठ नेते मा विश्वासराव निकम,माजी सरपंच श्री निवासराव शिंदे,सरपंच सौ आशाताई विश्वास निकम,उपसरपंच सौ शैलजा विशाल डोंगरे,मंडळाचे अध्यक्ष अशोक डोंगरे,उपाध्यक्ष दादासो उदांडे,हिंदू एकतेचे राहुलजी यादव,युवा नेते श्री विकास निकम ,अशोकराज पतसंस्थेचे अध्यक्ष अशोकराज चव्हाण,हिंदू एकतेचे सुयोग डोंगरे,पत्रकार विशाल पाटील,पोलीस पाटील काळुगडे साहेब,अनिल उदांडे तसेच मंडळाचे कार्यकर्ते,ग्रामस्थ उपस्थित होते