सुनील निंबाळकर बारामती प्रतिनिधी...
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते व आमदार अशोक पवार आमदार अतुल बेनके यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
बारामती विद्या प्रतिष्ठान येथील ग. दि. मा. सभागृहात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत 'माझा व्यवसाय, माझा हक्क' या उपक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी तालुक्यातील रोजगार निर्मितीला चालना मिळण्यासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. 'मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती' कार्यक्रम हा राज्यशासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असून ५ वर्षांत एक लाख सूक्ष्म व लघूउद्योग प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात येईल. या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उद्योजक तयार होतील. अनुसूचित जाती, जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक यांना योजनेत सवलत असून अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय आढावा व समन्वयन समिती स्थापन करण्यात आली आहे. उत्पादन, सेवा उद्योग, कृषी पूरक व्यवसाय, कृषीआधारित उद्योग, ई-वाहतूक व व्यवसाय, फिरते विक्रीकेंद्र या व्यवसायांत युवकांना व युवतींना संधी मिळतील. या योजनेच्या माध्यमातून प्रामाणिकपणे व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी पुढे यावं. योजनेचे निकष पूर्ण करणाऱ्या गरजूंना या योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्यातील युवक, युवतींनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असं आवाहन केलं. मानवतेच्या रक्षणासाठी कोरोना कालावधीत कोरोना योद्ध्यांनी केलेलं काम कायम स्मरणात राहील. राज्यात कोरोनाचे प्रमाण कमी होत आहे, याचं सर्व श्रेय कोरोना योध्यांना जातं. कोरोना कालावधीत डॉक्टर तसंच वैद्यकीय सेवा देणारे व सर्वच घटकांनी केलेलं काम निश्चितच कौतुकास्पद आहे असे अजित पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले.
चौकट....मुख्यमंत्री रोजगार निर्मितीतून युवकांना संधी!
मोबाईल क्लीनिक व्हॅन (मोफत फिरता दवाखाना)
आरोग्य शिबिर अंतर्गत फुप्फुस रोग, रक्त चाचणी व एक्स-रे निदान मोफत शिबीर राबविण्यात येणार.
या कार्यक्रमाचे संयोजन बारामती नगर परिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी केले. याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी पुणे जिल्हा परिषद बांधकाम सभापती प्रमोद काकडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे अध्यक्ष रमेश थोरात, कागलच्या बारामती नगरीचे नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती शहरातील तसेच ग्रामीण भागातील आजी-माजी नगरसेवक,नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती निता बारवकर, सदस्य ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थेचे पदाधिकारी, युवक ,युवती व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग.दी.मा. सभागृह विद्या प्रतिष्ठान बारामती या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.
बारामती विधानसभा मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी निर्माण करून देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमानंतर फॉर्म भरून घेण्यात आले. या उपक्रमांतर्गत फिरत्या व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असून विविध उपयोगी कामांसाठी टाटा एस (छोटा हत्ती) उपलब्ध करून देण्यासाठी नाव नोंदणी करण्यात आली.
कागदपत्राच्या अधिक माहितीसाठी व सदर अर्जासाठीचा कालावधी दिनांक ३१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२१ वेळ सकाळी १०.३० ते सायं.५.३० वाजता ठिकाण आसनात आहे. शारदा भवन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय बारामती असे असून कार्यालयात अर्ज उपलब्ध असणार आहेत. सदर अर्जाचा कालावधी १ फेब्रुवारी २०२१ ते १५ फेब्रुवारी २०२१ असा असणार आहे.
असा आहे उपक्रम….
या उपक्रमांतर्गत कृषीविषयक वाहतूक, फळभाज्या, चाट, नाश्ता, लंच, डिनर
यासह आठवडी बाजारातील विविध व्यवसाय करता येतील. त्यासाठी…..
पाच वर्षात एक लाख सूक्ष्म, लघु उपक्रम प्रस्थापित करणे.
१८ वर्षे पूर्ण तर ४५ वर्षाच्या आतील व्यक्ती पात्र.
अनुसूचित जाती, जमाती, महिला, अपंग, माजी सैनिकांसाठी ५० वर्षे कमाल वयोमर्यादा.*
दहा लाखांवरील प्रकल्पासाठी सातवी, तर २५ लाखांवरील प्रकल्पासाठी दहावी उत्तीर्ण. एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीस लाभ.*
बँक कर्ज ६०ते ७५ टक्के, भांडवल पाच ते दहा टक्के, शासन अनुदान १५ ते ३५ टक्के, प्रवर्ग व संवर्गनिहाय बँक कर्ज.
योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय आढावा व समन्वय समिती उत्पादन, सेवा उद्योग, कृषी पुरक व्यवसाय, कृषीवर आधारित उद्योग, फिरती विक्री केंद्र या योजनेअंतर्गत योजनेत सुरू करू शकतात.