पक्षाची विचारधारा तळागाळाच्या माणसांपर्यंत रुजवणार : दादासाहेब ओव्हाळ
रिपाइं ए चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर पक्षाचा झंजावात सुरु आहे. पक्षाची विचारधारा राज्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवण्यासाठी आणि रुजवण्यासाठी कार्यकर्ते झटत आहेत. कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहून पक्ष विस्तार केला जात आहे. जिथे अन्याय असेल तेथे रिपाइंचा प्रहार होईल, सामान्यांच्या हक्कासाठी रिपाइंचा निळा झेंडा दीपकभाऊंच्या मार्गदर्शनाखाली उंचावत राहू, असा विश्वास रिपाइं ए चे राज्याचे उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी व्यक्त केला.
मुंबई येथे रिपाइं एच्या राज्यव्यापी झालेल्या पदाधिकाऱयाच्या बैठकीत निवडी पार पडल्या. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यातून महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, असता तर महाराष्ट्र सचिव अशोक ससाणे, कार्यालयीन अध्यक्ष तानाजी मिसळे, सेक्रेटरी रमेश भोईर, युवक प्रदेशाध्यक्ष अमित वर्मा, युवकचे मुंबई अध्यक्ष अक्षय निकाळजे, मुंबई प्रभारी सोनवणे यांच्यासह पदाधिकाऱयांनी हजेरी लावली होती. याच बैठकीत दीपकभाऊ निकाळजे यांनी दादासाहेब ओव्हाळ यांची राज्याच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या निवडीबद्दल सातारा जिल्हा रिपाइं ए मध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
रिपाइं ए चे राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हळ या निवडीबाबत बोलताना म्हणाले, रिपाइं ए हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा एकमेव पक्ष आहे. निळय़ा झेंडय़ाखाली भिम चळवळीची मोट बांधलेला हा पक्ष राज्यातील प्रत्येक गावांमध्ये दीपकभाऊंच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी पोहचवला गेला आहे. सर्वसामान्यांना त्यांचे मुलभूत हक्क मिळावेत, दलितांवरील वाढते अत्याचार अन्याय थांबावेत, त्यांना त्यांचा मुलभूत हक्क मिळावा, यासाठी रिपाइं एचा कार्यकर्ता झटत असतो. लढत असतो. प्रशासनासोबत दोन हात करत असतो. न्यायासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलने करतो. रिपाइं ए ची विचारधारा गावगावोवाडीवस्तीवर पोहचवली गेली आहे. वाडीवस्तीवरील सर्वसामान्य कार्यकर्ता रिपाइं एच्या चळवळीत सहभागी होवू लागलेला आहे. न्याय हक्कासाठी लढू लागला आहे. दीपकभाऊंच्या मार्गदर्शनाखाली रिपाइं ए राज्यात प्रभावीपणे वाढवणार आहे, असे त्यांनी सांगितले.
त्यांच्या निवडीबाबत रिपाइं एचे सातारा जिह्यातील मदन खंकाळ,सोमनाथ धोत्रे, विक्रम वाघमारे, संजय गायकवाड, संजय कांबळे, मुकुंद माने, मदन खंकाळ, राम मदाळे, संतोष जाधव, संतोष ओव्हाळ, बाबा ओव्हाळ, जयवंत कांबळे आदींनी अभिनंदन केले.