नवारस्ता प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानावर एस. टी. कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मल्हारपेठ तालुका पाटण येथे आंदोलन करण्यात आले.
खा. शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानावर शुक्रवारी एस. टी. कर्मचाऱ्यांनी भ्याड हल्ला केला, या हल्ल्याच्या निषेधार्थ मल्हारपेठ येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पाटण – कराड रस्त्यावर आंदोलन करण्यात आले, तसेच हल्ला करणाऱ्यांवर शासनाने कडक कारवाई करावी अन्यथा याहीपेक्षा उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी राष्ट्रवादी युवा कार्यकर्त्यांनी दिला आहे.
मल्हारपेठ येथील ग्रामपंचायतीसमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवकाचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर शेडगे, समीर कदम, महिपती कदम, सुशांत पवार, अवधूत कांबळे, कुणाल चव्हाण, साहेबराव देसाई, मनोज चव्हाण, शंकर चव्हाण, अजित पानसकर, भानुदास सूर्यवंशी, रोहित कारंडे, प्रकाश पानसकर, दीपक भिसे, राष्ट्रवादीच्या महिला तालुका अध्यक्षा स्नेहल जाधव, युवती अध्यक्षा रोहिणी पाटील, रेखा पाटील, शोभाताई कदम, दिवशी गावच्या सरपंच सुवर्णा सूर्यवंशी, मीलन सय्यद, ग्रामपंचायत सदस्य सुषमा चव्हाण, भाग्यश्री हिरवे, संगीता वाघ, शोभा पडवळ, अनिता शेटे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.