पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथे सरस्वती महिला शेतकरी मल्टीपर्पज निधी च्या तिसऱ्या विस्तारित कक्षाचे उद्घाटन मा. शिवाजी पवार उपसरपंच बनपुरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उद्घाटक शिवाजी पवार यांच्यासह शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव कोळेकर, अशोक पाटील मंद्रुळकोळे, विलासराव सुतार मालदन, शंकरराव पाटील बनपुरी, प्रवीण लोहार, विनोद लोहार ढेबेवाडी, कमलाकर लोहार, सौ. निर्मला कोळेकर, चंद्रशेखर निकम, राजेश पवार आणि मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होता.
” भविष्याची चिंता टाळा फायदेशीर गुंतवणूक करा” या ब्रीद वाक्याला अनुसरून शिवाजीराव कोळेकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना गुंतवणूकीचे फायदे याबद्दल माहिती दिली. माहिती देताना लक्षावधी ठेव योजना, मुदत ठेव, रिकरिंग ठेव, दाम दुप्पट ठेव, ज्येष्ठ नागरिक ठेव, यांसह शेतीच्या सर्व कारणांसाठी कर्ज, महिला व पुरुष बचत गटासाठी कर्ज अशा विविध बहुउद्देशीय योजना बद्दल माहिती दिली.
सरस्वती महिला शेतकरी मल्टीपर्पज निधी बँक मुख्य शाखा पाटण येथे असून ढेबेवाडी हे तिसरे विस्तारीत कक्ष असल्याचे सांगितले ग्राहकांना तत्पर सेवा हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून या विस्तारित कक्षाची उभारणी करण्यात आली असल्याचे शिवाजीराव कोळेकर म्हणाले.