स्वच्छता म्हणजे आपले शरीर, मन आणि आपल्या सभोवतालच्या गोष्टी स्वच्छ करणे. स्वच्छता हा मानवी समुदायाचा एक अत्यावश्यक गुण आहे. विविध प्रकारचे आजार रोखण्यासाठी हा एक सोपा उपाय आहे. तो जीवनाचा कोनशिला आहे.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे समाजाशी असणारे नाते अधिक घट्ट होईल. ”स्वच्छ भारत, स्वस्थ भारत” अशा अभियानातंर्गत विद्यार्थ्यांनी ग्राम स्वच्छता करावी.
दैनंदिन उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी वैयक्तिक स्वच्छतेबरोबर सार्वजनिक आरोग्य विषयी जागरुकता निर्माण करावी. समाजात प्रबोधनात्मक विचार रुजविण्यासाठी या शिबीराच्या माध्यमातून शिंदेवाडी परिसर स्वच्छतेची मोहिम हाती घेतली हा उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रतिपादन मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. रविराज देसाई यांनी श्रीमती विजयादेवी देसाई सिनिअर काँलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या मौजे शिंदेवाडी या ठिकाणी विशेष श्रमसंस्कार शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. डी. एम. शेजवळ (दादा) हे होते तर या कार्यक्रमासाठी शिंदेवाडी गावचे सरपंच श्री. किसन तिकुडवे, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. कांबळे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. श्री. भिसे यांनी केले तर आभार प्रा. श्री. साठे सर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. कु. पूजा घोणे यांनी केले. सदर कार्यक्रमास शिंदेवाडी गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.