फलटण : फलटण सायकल असोसिएशन तर्फे आयोजित सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त 10 ऑक्टोबर रोजी ५७ कि.मी. सायकल राइडचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
त्यासाठी दिलेल्या लिंक वरून रजिस्टर करणे आवश्यक आहे.
https://forms.gle/mXhWZ2FKURPKEufg6 /
सायकल लाईट पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांना एक आकर्षक पदक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
सायकल राईडचा मार्ग-
छत्रपती शिवाजी महाराज चौक, मार्ग – छत्रपती शिवाजी महाराज चौक फलटण-सांगवी – बारामती (अभिराज लॉन्स) – सांगवी – फलटण (बारामती पूल) – फलटण – नाना पाटील चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक – डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक – डेक्कन चौक – महात्मा फुले चौक – मुधोजी क्लब मैदान असा आहे.
समारोप व बक्षीस वितरण, फलटण,दि. १० ऑक्टोबर २०२१ रोजी, वेळ : सकाळी ५:३० ते सकाळी ११:०० पर्यंत. मुधोजी क्लब, संपर्क क्र. 7387705577 आयोजक, फलटण सायकल असोसिएशन यांनी सहभाग घेण्यासाठी आव्हान केले आहे.