खासदार फंडातून करंजखोपला रस्त्याचे काँक्रिटीकरण प्रारंभ
पिंपोडे बुद्रुक- प्रतिनिधी करंजखोप ( ता . कोरेगाव ) येथे रणजितसिंह नाईक खासदार निंबाळकर यांच्या फंडातून बस स्थानक ते मशिद रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा प्रारंभ करण्यात आला . या कामासाठी भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र धुमाळ यांनी पाठपुरावा केला होता . त्याकरिता खासदारांनी सुमारे तीन लाख रुपयांचा निधी मंजूर केला . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातील शेवटच्या घटकाला डोळ्यासमोर ठेवून अनेक योजना राबवल्या आहेत . त्या तळागाळापर्यत पोहचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले पाहिजेत … प्रादेशिक पक्ष जनमानसात अपप्रचार करून पंतप्रधानाची प्रतिमा मलिन करत आहेत . तो आपण हाणून पाडायला हवा , असे श्री . धुमाळ या वेळी बोलताना म्हणाले .
कार्यक्रमाला भाजपचे प्रदेश प्रतिनिधी नंदकुमार यादव , युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस मयूर धुमाळ सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष हणमंतराव धुमाळ , यशवंत धुमाळ , बजरंग पिसाळ , शिराज शेख व ग्रामस्थ उपस्थित होते .
करंजखोप रस्त्याच्या कामाचा प्रारंभ करताना हणमंतराव धुमाळ ,राजेंद्र धुमाळ , मयूर धुमाळ .