फलटण : ज्ञान संकल्प सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य यांचे तर्फे आयोजित कार्यक्रमात संसदरत्न खा. सौ. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते फलटणचे विधिज्ञ जावेद मेटकरी यांना कार्यरत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
एडवोकेट जावेद मेटकरी हे प्रांतीय ग्राहक संरक्षण परिषद समिती भारत सरकारचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष असून गेली अनेक वर्षापासून ते ग्राहक चळवळीत सक्रिय आहेत. कुटुंबातील एकाला जर इतर मागास वर्गाचे प्रमाणपत्र मिळाले असेल तर कुटुंबातील इतर सदस्यांना सुद्धा इतर मागास वर्गाचे प्रमाणपत्र देणे आवश्यक असल्याचे त्यांनी शासनाला २०१७ मध्ये पटवून दिले व तसे परिपत्रक काढण्याची मागणी केली. त्यांनी वकील या नात्याने गरीब पक्षकारांची बाजू मांडून त्यांना न्याय मिळण्याच्या कामी मदत करत असतात. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय आदर्श कार्यरत्न गौरव पुरस्कार देण्यात आले आहे.
या वेळी पीडीसीसी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, राज्य राखीव पोलीस दलाचे श्रीकांत पाठक, दौंडचे तहसीलदार संजय पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस, दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजिंक्य वेळे, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, वैद्यकीय अधिकारी संग्राम डांगे, संस्थेचे सचिव वैभव गिते, तसेच आप्पासाहेब पवार अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तालुका, दौंड आदी मान्यवर उपस्थित होते. मेटकरी यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे फलटण येथे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.