फलटण : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची राज्य परिवहन महामंडळ शासनात विलीनीकरण करण्यासाठी प्रमुख मागणी आहे, तसेच इतर मागण्यांच्या समर्थनार्थ बुधवार दि.3 नोव्हेंबरच्या मध्यरात्री पासून एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलेला आहे.
दि. 3 नोव्हेंबर पासून बेमुदत उपोषण सुरू होते. त्याला महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी उस्फुर्त पाठिंबा दिला आहे. परंतु कृती समिती मार्फत कर्मचाऱ्यांचे शासकीय विलीनीकरण करण्याबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या भावना दुखावल्या गेले आहेत. त्यामुळे दि. 3 नोव्हेंबर च्या मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारत आहेत, अशा आशयाच्या एक निवेदन फलटण आगाराच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस निरीक्षक फलटण तसेच आगार व्यवस्थापक, फलटण तहसीलदार, मुख्याधिकारी, फलटण नगरपरिषद फलटण तसेच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण यांना या निवेदनाच्या प्रति दिलेल्या आहेत. शांततेत आणि सनदशीर मार्गाने बेमुदत संप पुकारला असल्याचे राज्य परिवाहन मंडळाने निवेदन दिले आहे.






















