साखरवाडी प्रतिनिधी: वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून पेट्रोल-डिझेल बरोबर स्वयंपाकाचा गॅस ही माहगल्या ने जनतेला या महागाईमुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षात जनता पूर्णपणे आर्थिक गर्तेत अडकली असता बेरोजगारी वाढली होती आता कुठेतरी जनतेची आर्थिक घडी व्यवस्थित बसत असताना वाढत्या महागाईला तोंड देता देता लोकांना नको झाली आहे जनता पुरी हैराण होत असताना साखरवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी या केंद्र शासनाच्या भाजप सरकारच्या विरोधात महागाईचा केक साखरवाडी येथील बस स्थानकावर कापण्यात आला सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजे गटाचे समर्थक दिलीप बाबा पवार यांनी आयोजित केलेल्या या निषेध कार्यक्रमासाठी फलटण तालुका पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर राष्ट्रवादी काँग्रेस फलटण तालुका अध्यक्ष सतीश माने श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन नितीन भोसले सुनिल माने के के भोसले बाळासाहेब भोसले ( वारकरी) ज्ञानबा माऊली पंचायत समितीचे माजी सदस्य सागर कांबळे खामगाव चे लोकप्रतिनिधी हिंदुराव वारे होळ सोसायटीचे माजी सदस्य गणपत धायगुडे सुभाष भोसले साखरवाडी ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले युवराज रणवरे गणपतराव पवार नितीन धुमाळ रघुनाथ साबळे इत्यादी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी साखरवाडी राजे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भाजप सरकारचा निषेध व्यक्त करीत कार्यकर्त्यांनी महागाईच्या विरोधात घोषणाबाजी केली