बाळासाहेब पाटील साहेब यांचे प्रयत्नाने किवळ – शामगांव रस्त्याच्या कामासाठी लागणारी वनविभागाची परवानगी अंतीम टप्यात .
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : उत्तर विधानसभा मतदार संघातील किवळ या गावापासून ते शामगांव पर्यंतचा ग्रामीण मार्ग- ६६ हा रस्ता दळणवळणासाठी वापरात आणताना हा रस्ता वनविभागाचे हद्दीमधून जात असल्याने त्याबाबतची वनविभागाची तात्काळ परवानगी मिळणेबाबत नामदार बाळासाहेब पाटील साहेब यांचे आदेशावरून कराड शासकीय विश्रामगृह येथे बैठक आयोजीत करण्यात आली होती . या बैठकीस माजी सनदी अधिकारी श्री. तानाजीराव साळुंखे , सह्याद्रि सह . साखर कारखान्याचे डे . सिव्हील इंजिनिअर श्री . प्रताप चव्हाण , कराड चे वनपरीक्षेत्र अधिकारी श्री.टी.डी.नवले , जि.प. बांधकाम उपविभागाचे उपअभियंता श्री.पी.के.पवार , शाखाअभियंता श्री . विक्रांत शिंदे , किवळ चे उपसरपंच श्री . राहुल साळुंखे , ग्रा.पं. सदस्य श्री . सुनील साळुखे , श्री . प्रकाश साळुंखेंसह वनविभागाचे अधिकारी , बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते . यासंदर्भात लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता किवळ ग्रामस्थांनी पूर्ण केली असून प्रांतअधिकारी यांनी नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे . लवकरच या कामास वनविभागाची मंजूरी मिळणार असून या रस्त्यासाठी पालकमंत्री महोदयांनी जिल्हा वार्षीक योजना ३०५४ मार्ग व पूल निधीमधून रक्कम रू . ३०.०० लाख निधी मंजूर करणेसाठी जिल्हा नियोजन अधिकारी यांना आदेश दिले आहेत . तसेच या कामासाठी लागणारा जिल्हा अधिवास अधिकारी यांचे नाहरकत प्रमाणपत्र मिळणेबाबत मा . नामदार बाळासाहेब पाटील साहेब यांनी मा . जिल्हाधिकारीसो यांना आदेश दिलेले आहेत .
त्यामुळे या रस्त्याची वनविभागाची परवानगी अंतिम टप्यात आलेली आहे . या विभागातील ग्रामस्थांची अनेक दिवसाची मागणी पूर्ण होणार असून , त्यामुळे कराड व खटाव हे दोन तालुके जोडले जाणार असून या दोन तालुक्यातील दळणवळण सुलभ होणार आहे . त्यामुळे किवळ व शामगांव ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .आढावा बैठकी प्रसंगी माजी सनदी अधिकारी तानाजीराव साळुंखे, प्रताप चव्हाण व शासकीय अधिकारी