सहाय्यक अभियंता यांना मागणीचे निवेदन
कराड : कराड मार्केट बैल बाजार ते मलकापूर रस्त्यावर गतिरोधक करण्याबाबत आज (दि.29) भारतीय जनता पार्टी मलकापूर नगरपरिषद नगरसेवक विक्रम चव्हाण यांच्या मार्फत सहाय्यक अभियंता यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनामध्ये म्हटले से की, कराड मार्केट यार्ड मलकापूर – नांदलापूर या दुतर्फा रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असल्यामुळे वाहनांचा भरधाव वेगाने ये-जा सुरू असते. वाहनांचा वेग मोठ्या प्रमाणात असल्याने येते मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. तरी या रस्त्यावर कुठेही गतिरोधक अथवा झेब्रा क्रॉसिंग पट्टे किंवा रोडकडेला पांढरे पट्टे मारलेले नाहीत. वाहनांचा वेग जास्त असल्याने लोकांना रस्त्यावरुन ये-जा करताणा त्रास होत आहे. येथील रहिवाशांच्या जीवाचे संरक्षण महत्त्वाचे आहे. तरी या रस्त्यावर अपघाताच्या ठिकाणी गतिरोधक तयार करावेत, जेणेकरून वाहनांचा वेग मर्यादा कमी राहील व लोकाना अपघातापासून वाचतील व सुरक्षितताही वाढेल.
नागरिकांच्या हिताचे असून या सर्व गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा व लवकरात लवकर गतिरोधक, झेब्रा क्रॉसिंग पट्टे कराड मार्केट यार्ड ते मलकापूर या रस्त्यावर करावेत, असे निवेदन भारतीय जनता पार्टी मलकापूर नगरसेवक विक्रम चव्हाण यांना सहाय्यक अभियंता यांना निवेदन दिले.






















