रोटरीचा स्तुत्य उपक्रम: २५ ग्रामीण महिलांना बास्केट बॅग प्रशिक्षण
पाचगणी : महिलांनी आता घरकामात अडकुन न रहाता संसाराला हातभार लावण्याकरिता लघुउद्योगातून स्वतःचआत्मनिर्भर होत सवक्तृत्वातून पुढे आले पाहिजे असे प्रतिपादन शिवाजी शिंदे यांनी केले
.आंब्रळ, ता. महाबळेश्वर येथे रोटरी क्लब पांचगणी व गोल्डन हार्ट फौंडेशन पुणे यांच्या संयुक्त विध्यामाने तसेच रोट्रियन विनिता चंद्रिका प्रसाद यांच्या सहयोगाने तीन दिवसीय बास्केटबॅग प्रशिक्षण सम्पन्न झाले त्याप्रसंगी रोटरी क्लब अध्यक्ष शिवाजी शिंदे बोलत होते. यावेळी रोटरी भारतभाई पुरोहित, रोट्रीयन संजय आंब्राळे, 1 पेस्टाईल मार्केटिंग शिवाजी गोळे, गोल्डन हार्टच्या प्रशिक्षणार्थी शहनाझ चावला, शमी वाघमले, कल्पना पुरोहित, आमला डिलिमा आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना शिवाजी शिंदे यांनी प्रशिक्षणकरिता उपस्थित महिलांना चूल आणि मूल यामध्ये अडकून न पडता सवक्तृत्वातून स्वतः च्या पायावर उभे रहा, असे सांगितले भारत भाई पुरोहित यांनी रोटरी सेवा भावी संस्था असून रोरटीच्या उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.
या प्रशिक्षणाला 25 महिला उपस्थित होत्या त्याना तीन दिवस बास्केट बॅग बनविण्याचे प्रशिक्षण यावेळी देण्यात आले.
याच प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थी महिलां ना पेस्टाईल मार्केटिंग डोंबविली संचालक शिवाजी गोळे यांनी कॉटन सॅनिटरीपॅड चा डेमो देत. आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी या संदर्भात व्यावसयाची संधी यावर मार्गदर्शन केले आणि उपस्थित महिलांना कंपनीच्या वतीने उपस्थित २५ महिलांना मोफत पेस्टाईल सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले.






















