महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी मसूर :कराड तालुक्यातील कृष्णा-कोयना नदिलगताचा व आरफळ कालवा गेलेला विभाग बागायती म्हणून ओळखला जातो.ऊसाला चांगला भाव मीळत असल्यांने अनेक शेतकरी ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात अलीकडच्या दोन वर्षात हुमणी कीडीचा प्रादुर्भाव होत असल्याने ऊस पीकांचे मोड्या प्रमाणात नुकसान होत आहे.सध्या काही शेतकऱ्यांच्या खोडावा पीकावर हुमणीचा प्रादुर्भाव झाला असून हाजोरो रूपयेच्या औषधाच्या फवरण्या करून काही फरक नपडल्यांने ते पाण्यात गेले आहेत.

इतर पीकाच्या तुलनेत ऊसाला हमी भाव असल्यांने चांगले पैसे मीळतात.चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतकरी जादा उत्पादन खर्च करता पण अलीकडच्या काही वर्षात लोकरी मावा,हुमणी कीडीचा प्रादुर्भाव होवू लागला आहे.हुमणीचा किडा उस पोखरुन घात असल्यांने ऊसाचे पीक वळुन जात आहे.हुमणीचा नायनाट करण्यासाठी शेतकरी रासायनिक फवरण्या बरोबर जैविक ओषधाच्या फवरण्या घेतात पण त्याचा काय उपयोग होत नसल्याचे दीसून येत आहे.
महागडी औषधे वापरुन हजोरो रूपये शेतकऱ्यांचे पाण्यात गेले आहेत.कोपर्डे हवेली येथील अनेक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या खोड्यावर हुमणीचा प्रादुर्भाव झाला असून ऊसाचे पीक वाया गेले आहे.
































