महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी फलटण : पंढरपूर महामार्गावर एका दुचाकीचा आणि चार चाकी गाडीच्या अपघातात दोन तरुण जखमी झाले आहेत. याप्रकरणी रात्री उशीरापर्यत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार दि. २६ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास फलटण-पंढरपूर महामार्गावर फलटण तालुक्यातील पिंप्रद गावालगत व्यसनमुक्ती युवक संघ महाराष्ट्र प्रवेशद्वार समोर दुचाकी क्रमांक एमएच ११ बी.डब्लू २२८२ या दुचाकीचा आणि चारचाकी गाडीचा अपघात झाला असून या अपघातात रोहित अण्णासाहेब भगत ( वय २०, रा. पिंप्रद ता. फलटण ) व तुषार अण्णासाहेब भगत (वय २२, रा. पिंप्रद ता. फलटण ) हे दोन तरुण जखमी झाले आहेत.
चारचाकी गाडीने दुचाकीवरून चाललेल्या दोघा तरुणांना सुमारे १५० ते २०० मीटर गाडीसह फरफटत नेहले. अपघातानंतर दुर्घटनेतील चारचाकी वाहनाचा चालक पसार झाला आहे. या अपघातात जखमी झालेले तरुण पिंप्रद गावातील असून ते आपल्या शेतामध्ये शेतीला पाणी देण्यासाठी जात होते यावेळी हा अपघात घडला. घटनास्थळावरून अपघात करून पसार झालेल्या चारचाकीचा शोध पोलीस घेत आहेत. रात्री उशीरापर्यत या अपघाताबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.