कराड : आनंदराव चव्हाण विद्यालयाचे सन १९ – ९५ च्या १० वी. बँचचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पारपडले. त्यावेळी हिंदी विषयासाठी अध्यापन करणारे महादेव आळंदे व इंग्रजीसाठी अध्यापन करणारे व विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक एस. वाय.गाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
एकुणच २५ वर्षाच्या कालखंडा नंतर सर्व मित्र मैत्रीणी एकत्र भेटण्याचा दुग्ध साखरेसारखा योग यावेळी जुळून आला.
संमेलनाच्या सुरवातीला प्रत्येकाने स्वतः विषयीची, कुटुंबा विषयीची व सध्या कार्यरत असलेल्या क्षेत्राविषयीची माहिती सांगितली. त्यानंतर वैयक्तिक चर्चा, दिलखुलास मनमोकळेपणाने बोलणे व स्नेह भोजन झाले. यानंतर पारंपारिक व सांस्कृतिक खेळ, संगीतखुर्ची, गाणी, कविता, आशा विविध मनोरंजन कार्यक्रम घेतले. “बालपणीेचा काळ सुखाचा” असा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी अरूण शिंदे, संजय पवार, विनायक कदम, अभिजीत शिंदे यांनी विषेश परिश्रम घेतले.

यावेळी १९९५ बँचचे विद्यार्थी व मलकापूर नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक आबासो सोळवंडे, शिवसेना कराड तालुक्याचे उपप्रमुख काकासाहेब जाधव , सतिश सावंत, रोहन जमदाडे, रामेश्वर माने, खाजासाब आहेरी, संदीप पवार, गणेश जाधव, मर्दानीखेळ प्रशिक्षक संजय येडगे, मलकापूरचे सामाजिक कार्यकर्ते आण्णासाे काशीद, सुभाष सुतार, रोहिणी शिंदे, माधुरी लठ्ठे, नजमा नदाफ, वैशाली लाड, प्रकाश पाटील, वैशाली चव्हाण, राजेंद्र बागल, अर्चना लोहार, डाॅ. शेखर एडगे, उदय पवार, मेहबूब बेग, सिध्दू सुर्वे, वैशाली सातव, संत्रिता चोरगे, विद्या हिनुकले, सुवर्णा घारे, अनिल इंगळे, रणजित पाटील, अँडव्होकेट गुलाब पाटील आदी विद्यार्थी व विद्यार्थांनी उपस्थित होत्या. जयदीप पाटील व नंदकुमार बागल यांनी आभार मानले.




















