फलटण : राजाळे, ता. फलटण गावात अवैध रित्या आरोग्यास दुखापत होईल अशी हातभट्टी ची दारू विक्री प्रकरणी राजाळे येथील विशाल वसंत खरात याच्या वरती फलटण ग्रामीण पोलीस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन मधून मिळालेल्या माहितीनुसार व फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल महेश चंद्रकांत जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवार दि. ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यामध्ये सुमारे ६०० रूपये किंमतीची ६ लिटर हातभट्टी ची दारू जप्त करण्यात आली आहे.
संबंधिताने त्याच्या कब्जात असलेली हातभट्टी दारू लोकांच्या आरोग्यास दुखापत होऊ शकते. एखाद्याने जास्त दारू पिल्याने त्याच मरण येऊ शकते, हे माहीत असतानासुद्धा त्याने हातभट्टीची गावठी दारू बेकायदेशीररीत्या ५० रुपये प्रति लिटर दराने खरेदी करून त्यात त्याचा फायदा व्हावा म्हणून त्यांनी १०० रुपये प्रति लिटर दराने बेकायदेशीररित्या विक्री करीता बाळगल्या स्थितीत मिळून आली. पुढील तपास फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अरगडे अधिक तपास करीत आहेत.