फलटण प्रतिनिधी.
फलटण तालुक्यातील दि एम्रल्ड हाईट्स इंटरनॅशनल शाळेमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जागतिक योग दिनामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन जागतिक योग दिन अतिशय उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना योगासनाचे बकासन, मयुरासन, शिर्षासन, धनुरासन असे वेगवेगळे प्रकार प्रत्येक्षात करून दाखवण्यात आले. व ही योगासने केल्याने होणारे फायदे म्हणजे फक्त शरीरच तंदुरुस्त राहत नाही, तर त्यामुळे मनःशांती, तजेलदार त्वचा मिळते. तसेच वजनातही घट होते. योगासने करण्याला वयाची कोणतीही मर्यादा नसते. फक्त तुमच्या शरीरयष्टीनुसार व तुम्हाला असलेल्या व्याधींनुसार योगासने निवडावीत असे आवाहन शाळेच्या इन्चार्ज शितल कुंभार यांनी विद्यार्थ्यांना दिले.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली दत्तात्रय शिंदे, शाळेच्या इन्चार्ज शितल कुंभार, सविता जगताप, संध्या जगताप, पुनम शेलार, स्नेहल पवार, सुषमा गायकवाड सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.






















