कराड : देश सेवा करुन परत आलेल्या सैनिकांना झेंडावंदनाला सन्मान देवून गावाने त्यांचा सन्मान केला. सरपंच संग्राम पवार यांच्या संकल्पनेतून हा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. याचं गावातून आणि पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.
१५ ऑगस्ट च्या झेंडावंदनाचा मान हा वेळेत कर भरणारे नागरिकाला देण्याची घोषणा सरपंच संग्राम पवार यांनी केली.
जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यानि भाषणे करुन उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक युवक आणि युवती, सरपंच संग्राम पवार, उपसरपंच आनंदी पवार, धनंजय पवार, संतोष कोळी, हणमंत शिंदे, तुषार पवार,
शिला पवार, रंजना पवार, सुजाता पुजारी, ग्रामसेवक संजय घुटे, फौजी संतोष पवार, फौजी महेश गावडे
यांच्या उपस्थित ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.