महाराष्ट्र्र न्यूज कराड प्रतिनिधी :
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मागील दहा महिन्यांपासून बंद असणारी चित्रपटगृहे सुरू करण्याचा निर्णय शासन पातळीवर झाला आहे. मात्र तरीही कराड शहरातील चित्रपटगृहे अद्याप बंदच आहेत. अजून पंधरा दिवस तरी ही चित्रपट गृहे सुरू होणार नाहीत असे सांगण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर गर्दी टाळण्यासाठी चित्रपटगृहे व नाट्यगृहे बंद ठेवण्याचा निर्णय शासन पातळीवरून घेण्यात आला होता.
मार्चपासून चित्रपटगृहे बंद आहेत त्यामुळे चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याचा आनंद रसिकांना घेता आला नाही. मागील आठवड्यात शासनाने चित्रपटगृहे सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र कराड शहरातील चित्रपटगृहे अद्याप सुरू झालेली नाहीत. नविन चित्रपटही प्रदर्शित झालेले नाहीत. कंपनीबरोबर चित्रपट चालकांची बोलणी सुरू असून पंधरा दिवस तरी चित्रपटगृहे सुरू होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. शहरातील चित्रपट रसिक मात्र चित्रपटगृहे कधी सुरू होणार याकडे लक्ष ठेवून आहेत.
































