कराड : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या उत्साह सर्वस्तरात पहायला मिळतो. युवकांना अखंड प्रेरणा देणारा उर्जेचा स्त्रोत म्हणून शिवरायांकडे पाहिले जाते. शिवजंयतीला सर्वार्थाने आगळेवेगळे महत्व आहे. कोरोना संकटात सावरणाऱ्या समाजाला चैतन्य उत्साह देणारा या वर्षीचा
शिवजयंती दिनाचे औचित्य साधून DJ’S सामाजिक व शैक्षणिक संस्थेने आज 19 फेब्रुवारी 2022 रोजी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदानाचे महत्व व रक्तदानासाठी युवकांना प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने ‘ रक्तदान शिबीर’ आयोजित केले.होते़
DJS सामाजिक व शैक्षणिक संस्था (NGO) आजवर विविध क्षेत्रात सेवाभावाणे कार्यरत आहे. आपत्ती व्यवस्थापन, सैनिक कल्याण याबाबत विशेष संवेदनशीलतेने संस्था कार्यरत आहे.
आज या शिबिरात सर्व रक्तदात्यांना शिव रक्तदाता म्हणून प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले. आज या रक्तदान शिबिरात कराड चे प्रांताधिकारी श्री. उत्तम दिघे साहेब, शिवसेना कराड ती.प्रमुख श्री. नितीन काशिद, कराड च्या माजी नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे यांनी भेट देवून सर्व रक्तदात्यांचे व DJS सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या कार्यांचे कौतुक केले.
हे रक्तदान पुढे आठ दिवस सुरु राहणार आहे, तरी सर्व इच्छुक रक्तदात्यांनी स्व. वेणूताई चव्हाण उप जिल्हा रुग्णालय येतील रक्तपेढीत येवुन रक्तदान करावे व आपले शिव रक्तदाता हे प्रशस्तीपत्र मिळवण्यासाठी आम्हाला ९९७०२३३७७७ या क्रंमांकावर संपर्क किंवा व्हॅाट्सॲप करावे असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. धवल जाधव यांनी केले आहे.संस्थेचे उपाध्यक्ष श्री. शंकर साळुंखे, अकांक्षा पाटील, अमित बडीगीरे, विनायक ढवळे व इतर सर्वांनी रक्तदान केले व रक्तपेढीतील सर्वांचे आभार मानले.