फलटण /प्रतिनिधी :श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण , शिक्षण विभाग व शासनाच्या गलथान व भ्रष्ट कारभाराला कंटाळून कै. धोंडीराम खरात यांच्या कुटुंबाचा प्रजासत्ताकदिनी आत्मदहन करण्याचा इशारा फलटण येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आला आहे.
याबाबत खरात कै धोंडीराम खरात यांच्या कुटूंबियांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, श्रीराम एज्युकेशन सोसायटीने कै. धोंडीराम खरात यांना आजअखेर नैसर्गिक नियमाप्रमाणे कोणताही न्याय दिला नाही. कै धोंडीराम खरात हे सेवाजेष्ठ होते शासनाने व शिक्षण विभागाने वेळोवेळी संस्थेवर प्रशासक नेमणे , संस्थेची मान्यता काढून घेणे , वेतनेतर अनुदान रोखणे इत्यादी सारखे आदेश वेळोवेळी दिले परंतु संस्थेने एकाही आदेशाला जुमानले नाही. कै धोंडीराम खरात यांना हजर करून घेतले नाही. कै धोंडीराम खरात यांना मुख्याध्यापक न करता इतरांना मुख्याध्यापक बनविले. कोणत्याही कित्येक वर्षे घरी बसविले व धोंडीराम खरात यांची वारंवार सर्वस्तरावर कुचंबणा झाली होती. त्यांच्या निधनानंतर तरी त्यांना न्याय मिळावा असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
याचिका ३८८९ /९३ इंटेरियरम मंजूर केला असताना खरात यांना राजाळे येथील मुख्याध्यापक पदावर सेवेत ठेवावे आणि पदाचे वेतन, भत्ते द्यावेत हाच इंटेरियर निकालामध्ये कायम केला . खरात यांची राजाळे येथील मुख्याध्यापक बढती वैद्य व कायम केली , तरीही संस्थेने शिक्षणाधिकारी यांना हाती धरून अनपट व पटवर्धन यांना बेकायदा बढती दिली व खरात यांना पदावनत केले.
दिनांक ०२/०१/१९९५ रोजी खरात सर पोलीस संरक्षणात हजर झाले परंतु संस्थेने ०३/०१/१९९५ पासून खरात यांना सेवेतून घरी ठेवले . खरात यांनी संस्थेवर फौजदारी केली त्यावर मे . हायकोर्ट व शासन हुकुम डावलून खरात यांना मुख्याध्यापक असताना उपशिक्षक केले .शिक्षणाधिकारी शितोळे यांनी अनपट यांची बदली मान्यता रद्द केली व खरात यांना मान्यता दिली. दिनांक ०२/०१ /१९९५ रोजी खरात पोलीस संरक्षणात हजर झाले परंतु संस्थेने ०३/०१/१९९५ पासून खरात यांना सेवेतून घरी ठेवले.
धोंडीराम खरात यांनी संस्थेवर फौजदारी केली त्यावर मे . हायकोर्ट व शासन हुकुम डावलून खरात यांना मुख्याध्यापक असताना उपशिक्षक केले . या प्रकारे अनेक वेळा प्रभारी मान्यता देत खरात यांना मुख्याध्यापक पदापासून दूर ठेवले , त्यामुळे शासनाने व शिक्षण विभागाने वेळोवेळी संस्थेवर प्रशासक नेमणे , संस्थेची मान्यता काढून घेणे , वेतनेतर अनुदान रोखणे इत्यादी सारखे आदेश वेळोवेळी दिले परंतु संस्थेने एकाही आदेशाला जुमानले नाही व खरात सर यांना हजर करून घेतले नाही .
शिक्षणाधिकारी व उपसंचालक या दोन्ही ही कार्यासनांना पुरावे देऊन सुद्धा हे दोन्ही ही कार्यासने भ्रष्टाचारात संस्थेच्या बाजूने अहवाल शासनास सादर करीत असल्यामुळे आम्हास न्याय मिळाला नाही न्यायव्यवस्था म्हणते महाराष्ट्र शासना कडे जावा , शासन म्हणते की शिक्षणाधिकारी यांच्यापासून अहवाल येऊ द्यात आणि शिक्षणाधिकारी व उपसंचालक हे संस्थेच्या भ्रष्टाचारात किंवा संस्थाचालक हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असल्यामुळे व भाजपचे नगरसेवक असल्यामुळे संस्था धार्जिणी अहवाल तयार करीत आहेत . त्यामुळे आमच्यापुढे आत्मदहनाचे शिवाय पर्याय उरला नाही म्हणून २६ जानेवारी २०२२ रोजी आम्ही आत्मदहन करणार आहोत. आमच्या मृत्यूस श्रीराम एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे सचिव सचिन सुभाष फडके , सुभाष नामदेव बेडके, लिपिक चंद्रकांत पवार, उपसंचालक कदम, उपसचिव फडके, शिक्षणाधिकारी क्षिरसागर, शिक्षणाधिकारी कोळेकर, जनरल अधीक्षक खाडे, वेतन अधीक्षक सपकाळ, चंदूरे व उपसंचालक कार्यालय, संबंधित सर्व व्यक्ती जबाबदार असतील असे म्हटले आहे.
११/०७/२०१४ रोजी केले ते ज्ञापन रद्द करून खरात सरांना ०७/०६/१९९४ ते १३/०४/२००० हा काळ ते सेवा सातत्य धरून त्या काळातील ज्ञेय वेतन वेतन वाढी भत्ते फरका सह मंजूर करावेत अन्यथा प्रजासत्ताकदिनी कै. धोंडीराम खरात यांचा मुलगा व मुलगी आत्मदहन करतील असा इशारा प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.




















