पुसेगाव दि .[प्रतिनिधी ]
लग्नाचे अमिष दाखवून खटाव तालुक्यातील एका गावातील पीडित मुलीवर वेळोवेळी बलात्कार करून आरोपी राघू रामचंद्र जाधव वय वर्ष 34 हा फरार झाला होता. त्याला पुसेगाव पोलिसांनी पकडून अटक केली व वडूज न्यायालयात हजर केले असता आरोपीस 4 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस स्टेशन कडून मिळालेले माहितीनुसार
संतोष मसुगडे राहणार डिस्कळ याने 29 रोजी पुसेगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून 14 वर्षीय पीडित मुलीस कोणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेले ही तक्रार दाखल करण्यात आली होती व त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यास अनुसरून पुसेगाव पोलिसांनी सदर पीडित मुलीचा शोध घेतला असता सदर मुलगी डिस्कळ येथील एका शेतात मिळून आल्यानंतर चौकशी दरम्यान पीडित मुलीने दि . 31 डिसेंबर रोजी मिळून आल्यानंतर तिने दिलेल्या जबाबानुसार पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे वर वेळोवेळी डिस्कळ बेघर वस्ती येथील शेतात तसेचआरोपी राघू रामचंद्र जाधव याचे राहते घरी नेहून पिढीतेचे मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले बाबत पीडितीने सांगितले सदर आरोपीला अटक करून बलात्कार व पोक्सो कलमाची वाढ करून वडूज न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीस 4 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पुसेगाव पोलीस ठाण्याचे सपोनी आशिष कांबळे हे करीत आहेत.