महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी
सातारा दि. 19 : सध्या उरमोडी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने, धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला आहे व त्यामुळे धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने सतर्क राहणे आवश्यक असल्याने उरमोडी धरणामधून कोणत्याही क्षणी नदीपात्रात पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे उरमोडी धरणाच्या वरील व खालील बाजूच्या नदीकाठच्या ग्रामस्थांनी सतर्क राहण्याबाबत उपविभागीय अधिकारी उरमोडी सिंचन व्यवस्थापन उपविभाग सातारा यांनी कळविले आहे. तसेच ज्या लोकांनी बुडीत क्षेत्रामध्ये अतिक्रमणे केली असतील त्यांनी ती काढून घ्यावीत. बुडीत क्षेत्राजवळ नदीकाठी जनावरे घेऊन जाऊ नये, नदीकाठी असणारे विद्युतपंप काढून ठेवण्यात यावेत, असे आवाहनही उपविभागीय अधिकारी उरमोडी सिंचन व्यवयस्थापन उपविभाग, सातारा यांनी केले आहे.