कराड : आगाशिवनगर येथील दक्त मंदिर ते आनंद नगरी पर्यंतच्या मुख्य रस्त्याचे काँक्रिटिकरण व नूतनीकरण करण्याच्या कामाचे उद्घाटन तसेच भूमिपूजन करण्यात आले. दलित सुधार योजने अंतर्गत येणाऱ्या विकास निधीमधून सुमारे काही दशलक्ष रुपयांची प्रभाग क्र. ५ मध्ये अनेक विकास कामे सुरू आहेत.
या भूमीपूजना प्रसंगी नगराध्यक्षा निलमताई येडगे, उपनगराध्यक्ष मनोहरभाऊ शिंदे, बांधकाम सभापती राजेंद्र आबा यादव, नगरसेविका कमलताई कुराडे, नगरसेवक सागर जाधव, जयंत कुराडे, समीर तुपे तसेच स्थानिक रहिवासी आणि जेष्ठ नागरिक उपस्थित होते.