कराड : मलकापूर हद्दीतील लक्ष्मी कॉलनीजवळ एका नववीत शिकणाऱ्या मुलीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलेली आहे. पायल लोंढे असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. घटनास्थळी कराड शहर पोलिसांनी धाव घेतलेली असून अधिक माहिती घेत आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मलकापूर येथील गोकाक पाणीपुरवठा परिसरातील लक्ष्मी कॉलनीत एका घरात नववीत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केलेली आहे. आज शुक्रवारी दि. 28 रोजी सकाळी ही घटना समोर आली आहे. पायलचे आई व आजी- अजोबा काल लग्नाला बाहेरगावी गेलेले होते, त्यानंतर आज सकाळी लग्नाहून आल्यानंतर आजोबांना पायलने गळफास घेतल्याचे दिसून आले. राहत्या घरात कोणी नसताना पायलने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.