महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / दहिवडी :
माण तालुक्यातील आरोग्य जीवन म्हणून ओळखले जाणारे पुळकोटी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयावर रात्री झालेल्या मुसळधार पाऊस आणि त्यामध्ये विजांचा जोरदार कडकडाट चालू होता त्यामध्ये गावातच असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयात जोरदार वीज पडली वर्ग चार खोलीवर ही पडली असून खोलीचा स्लॅब तुटून खाली पडला आहे.
वातावरण एवढे कधीच बदलले नाही. विजेमध्ये एवढी मोठी ताकद पहिल्यांदा पाहायला मिळाली आतापर्यंत महाराष्ट्र मध्ये बऱ्याच ठिकाणी वीज पडल्या आहेत. पण आतापर्यंत स्लॅब कधीही तुटला नाही. बहुतेक हे महाराष्ट्रातील पाहिले उदाहरण असण्याची शक्यता आहे. हे रुग्णालय फार वर्षपूर्वीचे आहे. टाटा कंपनी ने शेकडो वर्षपूर्वी या रुग्णालयाचे बांधकाम केले आहे. इतके मजबूत बांधकाम आहेकी. लोक सांगतात. कोणत्याही औजाराने तोडफोड केली तरीही हे बांधकाम तुटत नाही इतके मजबूत आहे.

मात्र या विजेच्या ताकदीने हे तुटल्यामुळे पुळकोटी गावात आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आतापर्यंत गावात कधीही वीज पडण्याचे प्रकार घडले नाहीत. मात्र या निसर्गाच्या बदलामुळे काहीही घडू लागल्यामुळे लोकांनी काळजी घेणे खूप गरजेचे आहे. विजेच्या कडकडाट मध्ये बाहेर फिरू नये. रात्री घडलेल्या प्रकारात नशिबाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वर्ग चार खोलीत कोणीही नसल्याने फार मोठा अनर्थ टळला आहे. मात्र रुग्णालयाचे मोठे नुकसान झाले आहे.






















