महाराष्ट्र न्यूज बिदाल प्रतिनिधी : धनगर आरक्षण हा प्रश्न अनेक वर्षापुन प्रलंबित आहे धनगर आरक्षण संदर्भात अनेक वेळा आंदोलने मोर्चे उपोशने केली परंतु आजूनपर्यंत धनगर आरक्षण चा प्रश्न सुटलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. असे मत सामाजिक कार्यकर्ते सुनील वाघमोडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
यावेळी वाघमोडे बोलताना म्हणाले सम विचारी लोकांनी एकत्रित येऊन कोणताही राजकारण न करता एक सामाजिक मध्ये साधून राज्यस्तरीय लढा उभारन सामाजिक व आरक्षना सारखे विषय हाताळावे आणि समाजात चालू असलेल्या हुजरेगिरीला आळा घालावा कारण कोणताही राजकीय पक्ष आरक्षण देईल असे वाटत नाही. कारण सर्व राजकीय पक्षांची सत्तेत असताना वेगळी भूमिका व विरोधी पक्षात आसल्यावर वेगळी भूमिका असते त्यामुळे यापुढे समाजाने व समाजातील बांधवानी राजकीय दलालाची भूमिका बजावणाऱ्यांना बाजूला करून ना नेता ना पक्ष या तत्वावर आरक्षण व समाजिक विषयवार सम विचारी लोकांनी एकत्रित येऊन निःपक्षपाती सामाजिक प्रश्न सोडवण्याची गरज आज समाजाला आहे.





















