जांभुळणी तालुका माण येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी तिर्थक्षेत्र श्री.भोजलिंग विकास आघाडीच्या सुशिला सिताराम काळेल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच स्वाती सिद्धेश्वर काळेल यांनी राजीनामा दिल्याने,रिक्त झालेल्या पदासाठी जांभुळणी ग्रामपंचायत इमारतीत निवड प्रक्रिया पार पडली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक बाबासाहेब बोराटे यांनी काम पाहिले.यावेळी उपसरपंच बापू काळेल,सिद्धार्थ तोरणे,सिंधु कोकरे,सुनिता कोकरे,कविता सरगर,गजेंद्र काळेल आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.एका सर्वसामान्य महिला ग्रामपंचायत सदस्याला सरपंच पदाची संधी मिळाल्याने, कार्यकर्ते आणि समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठ्या जल्लोषात गावातून मिरवणूक काढण्यात आली.यावेळी जांभुळणी परिसरात नागरिकांच्या हिताच्या सर्व शासकीय योजना अमलात आणून,गावच्या सर्वांगीण विकासासाठी कायम प्रयत्नशील असल्याचे सरपंच सौ. सुशिला काळेल यांनी सांगितले.मुंबई हायकोर्टाचे अँड.सिद्धेश्वर काळेल,माजी सरपंच बाबा काळेल,रायचंद काळेल,नाथा काळेल सचिन काळेल,रघु कोकरे,जिंदास काळेल,संतोष काळेल,सचिन काळेल,भारत काळेल,रूयबा काळेल,विजय केंगार,संजय तुपे,गणेश खिल्लारी,राहुल तोरणे,सचिन तोरणे,विलास पुकळे,हणमंत काळेलसह ग्रामस्थांनी अभिनंदन केले….