फलटण : भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारणीकडून पुन्हा एकदा नगरसेवक अनुप शहा यांच्यावर खांद्यावरती मोठी जबाबदारी दिली आहे. भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी नगरसेवक अनूप शहा यांची निवड करण्यात आली आहे.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व फलटण चे विरोधी पक्षनेते समशेर सिंह नाईक निंबाळकर यांच्या सूचनेनुसार त्यांची निवड करण्यात आली. मुंबई येथे ते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इजाज देशमुख व जमाल सिद्धीक यांच्या हस्ते अनुप शहा यांचा निवडी बद्दल सत्कार करण्यात आला.
फलटण मधील गोर गरिबांचा कैवारी म्हणून ओळखला जाणाऱ्या व सर्वसामान्य जनतेसाठी त्यांच्या हक्कासाठी व त्यांच्या न्यायासाठी सतत झगडणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुप शहा यांची भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी अनुप शहा यांच्या कामांच्या धडाका पाहून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्यावरती महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक मोर्चा उपाध्यक्षपदी निवड केल्यामुळे फलटणमध्ये त्यांचा भव्य सत्कार समारंभ फलटण तालुका भाजप च्या वतीने घेण्यात येणार आहे.