पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थित
कराड : माणसाला जात, धर्म, पंथ असला तरी प्रत्येक व्यक्तीमध्ये जातीय सलोखा, राष्ट्रीय एकात्मता असतेच. ती जागृत करण्याच्या उद्देशाने पूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘राष्ट्रीय एकात्मता आणि जातीय सलोखा दिवस’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर कराड येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कराड उत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष देवराजदादा पाटील, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर, कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, जेष्ठ नेते सुभाष पाटील (काका), संभाजीराव गायकवाड, कांतीलाल पाटील, गंगाधर जाधव, सांगिता साळुंखे, मीना बोरगावे, आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब सहकारी बँकेचे संचालक सागर पाटील, कराड नगरपरिषदेचे विरोधीपक्षनेते सौरभ पाटील, शिवाजी पवार, सुहास पवार, संतोष पाटील, वैभव हिंगमिरे, संतोष वेताळ, मोहसीन अंबेकरी, संजय पिसाळ पांडुरंग चव्हाण, अनुज पाटील, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे आजी माजी संचालक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.