फलटण : राजुरी, ता.फलटण येथील पोलीस पाटील लक्ष्मण सुहास बागाव याच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजुरी येथील पोलीस पाटील लक्ष्मण बागाव याने राजुरी गावच्या हद्दीत दि.२ फेब्रुवारी रोजी अल्पवयीन मुलगी एकटी बघून तिचा पाठलाग केला तसेच तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करून पीडित मुलीच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी राजुरी येथील पीडित मुलीने पोलीस पाटला विरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस पाटील लक्ष्मण बागाव याच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे स.पो.नि.सोनवणे करीत आहेत.





















