देव माणूसची कथा एका सिरीअल किलरची गोष्ट आहे. झी-5 वरील एका आर्टिकलनुसार, ‘देव माणूस’चे कथानक हे एका डॉक्टरच्या जीवनातील सत्य घटनेवर आधारित आहे. एरवी जो एखाद्या सभ्य माणसाप्रमाणे वागतो आणि आपल्या निष्पाप चेहऱ्याखाली आपले भ-या-न-क रहस्य लपवतो. सातारा जिल्ह्यातील वाई परिसरात प्रसिद्ध असलेला डॉ. संतोष पोळ नावाचा हाखुनी डॉक्टर, ज्याने स्वतः 3 आणि आपल्या प्रियेसी नर्स ज्योती मांंढरेच्या मदतीने 3 असे 6 खून अत्यंत निर्दयतेने केले होते.महाराष्ट्र पूर्व प्राथमिक शिक्षण कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा मंगल जेधे यांच्या अपहरण आणि खून प्रकरणी संशयित म्हणून डॉ. संतोष पोळला अटक झाली होती. तपासाअंती पोलिसांना तो दोषी आढळला. त्यावेळी डॉ. संतोष पोळ याने भूतकाळात त्याने स्वतः आणि आपली प्रियेसी नर्स ज्योती मांढरे च्या मदतीने केलेल्या इतर सर्व खूनांबद्दलची कबुली पोलिसांना दिली होती.
‘देव माणूस’ची कथा याच डॉ. पोळच्या अवती भोवती फिरते. हा डॉ. इंटरनेटवर डॉ. डेथ या नावानेही प्रसिद्ध आहे. झी मराठी शोमधील या सिरीअल किलरची डॉक्टरची भूमिका लागिरं झालं जी मालिका फेम अभिनेता किरण गायकवाड निभावतोय. ‘देव माणूस’ ही सिरीयल लवकरच समाप्त होणाऱ्या झी मराठीवरील लोकप्रिय रात्रीस खेळ चालेच्या जागी प्रसारित होणार आहे. या मालिकेचे दिग्दर्शन राजू सावंत यांनी केले आहे.झी मराठीवर ‘देव माणूस’ ही सायको थ्रिलर मालिका दि. ३१ ऑगस्ट २०२० पासून सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वा. असे आठवड्यातील ६ दिवस प्रसारित होईल. चॅनेल व्यतिरिक्त, Zee5 App. व अधिकृत संकेतस्थळा वरून डाउनलोड करूनही तुम्ही सर्व भाग पाहू शकतात. राजू सावंत दिग्दर्शित सत्य घटनेवर आधारलेला हा गूढ मालिका पहाणे रोमांचकारी ठरणार आहे.झी मराठीच्या या आगामी थ्रिलर शोचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला असून उत्सुकते सोबतच त्याच्यावर हे इतके भयानक कसे काय दाखवताय?” असे ट्रोलिंग ही झाले आहे..व्यवसायाने डॉक्टर असलेल्या केलेला या सिरीयल किलरला त्याचे पेशंट मात्र देवदूत समजतात. अशा विचित्र कथानकासह, या मालिकेचे निर्माते व दिग्दर्शक प्रेक्षकांसमोर हा डार्क सायको थ्रिलर कसा सादर करणार हे पाहणे फारच रोमांचकारी ठरेल