सातारा- जिल्हाधिकारी कार्यालय सातारा या ठिकाणी भारत मुक्ती मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या आदेशाने ईव्हीएम मशीन विरोधामध्ये आंदोलनातील दुसरा टप्प्यातील धरणे आंदोलन करण्यात आले तसेच ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपर ने निवडणुका घेण्यात याव्यात ही प्रामुख्याने मागणी होती कारण ईव्हीएम च्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या निवडणुका पारदर्शक होत नाहीत हे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले त्यामुळे लोकशाही धोक्यात येऊन लोकांच्या मताची किंमती शून्य झाली आहे.
निवडणूक आयोग नवी दिल्ली यांनी ईव्हीएम मशीन जर बंद केली नाही तर येत्या ३१ जानेवारी ला निवडणूक आयोगाच्या दिल्ली येथील कार्यालयावर पाच लाख लोकांचा मोर्चा काढणार आहे असे वामन मेश्राम यांनी जाहीर केले आहे. या आंदोलनावेळी बहुजन मुक्ती पार्टी चे महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य तुषार मोतलिंग, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे जिल्हा सचिव विनोद लादे, कराड तालुका अध्यक्ष माननीय कैलास कांबळे लहुजी क्रांती मोर्चा चे सोमनाथ आवळे व त्यांचे सहकारी तसेच राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे भाऊसाहेब काळोखे व त्यांचे सहकारी भारतीय विद्यार्थी मोर्चा सातारा जिल्हा युनिट राष्ट्रीय भटके मुक्त मोर्चा राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा या सर्व सामाजिक,राजकीय संघटना भारत मुक्ती मोर्चा च्या ईव्हीएम विरोधी आंदोलनामध्ये सहभागी होत्या.


















