रविवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी मौजे लिंबाचीवाडी येथे मराठा सेवा संघ – संभाजी ब्रिगेड सातारा जिल्हा पुनर्गठन पुनर्बांधणी बैठक व भव्य ग्रामशाखा उद्धाटन सोहळा उत्साहात पार पडला .
सदर बैठकीत बोलताना प्रदेश कोषाध्यक्ष अमोल काटे म्हणाले की सातारा जिल्हा हा क्रांतिसिंह नाना पाटील , यशवंतराव चव्हाण अशा क्रांतिकारक समाजशील नेतृत्वाचा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो पण अलीकडच्या काळात साताऱ्यात प्रतिगामी शक्ती जोर धरत असून त्यांना रोखण्यासाठी संभाजी ब्रिगेड जिल्ह्यात गाव तिथे शाखा हे अभियान राबवणार असून याची सुरुवात लिंबाचीवाडी पासून आपण करत आहोत . यावेळी सातारा जिल्हा पश्चिम विभाग जिल्हाध्यक्षपदी शिवम कदम , जिल्हा संघटक पदी – कैलास कुंभार , वाई तालुकाध्यक्ष पदी – नितीन पवार , वर्णे जिल्हा परिषद गट अध्यक्ष – ऋषिकेश कणसे , लिंबाचीवाडी ग्रामशाखा अध्यक्ष – शुभम देशमुख यांच्या निवडी पार पडल्या .सदर बैठकीस प्रमुख उपस्थिती म्हणून सिने अभिनेते – किरण माने , प्रदेश कोषाध्यक्ष – अमोल काटे , प्रदेश संघटक – प्रदिप कणसे , कोकण विभाग अध्यक्ष – सचिन सावंत देसाई , सातारा जिल्हाध्यक्ष – अनिल जाधव , नवी मुंबई जिल्हाध्यक्ष – सुभाष सावंत , कराड तालुकाध्यक्ष – संभाजी शेडगे , सातारा शहराध्यक्ष – अनिकेत मोरे , सातारा तालुकाध्यक्ष – ऋषिकेश जाधव इत्यादी उपस्थित होते सूत्रसंचालन अरविंद कणसे यांनी तर आभार प्रशांत कणसे यांनी मानले .Attachments area




















