लोणंद : लोणंद व खंडाळा येथील दुकानातील कॅश चोरीच्या गुन्हांची उकल करण्यात व आरोपीला अटक करण्यात लोणंद पोलीसांना यश आले.
पोलिसांन कडुन मिळालेली माहीती अशी, दि. २ ९ सप्टोंबर रोजी तकारदार हर्षद रामचंद्र गजबळ (रा.बिरोबावस्ती, लोणंद, ता.खंडाळा) यांचे एच आर कॉस्पीट्रॉनिक्स या दुकानात दि. २५/०९/२०२१ रोजी ग्राहक म्हणुन आलेल्या दोन पुरुष संशीयातांनी दुकानात सुटटे पैसे हवे आहेत असे सांगून, कपाटातील विक्रीसाठी ठेवलेला नविन विवो कंपनीचा मोबाइल व कॅश कांऊटर मधील रोख रक्कम असा एकुन २७००० हजार रुपयेचा मुददेमाल हातचलाखीने चोरुन नेहल्याची फिर्याद वरून लोणंद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हातील आरोपीताचा शोध घेवुन अटक करणे बाबत फलटण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे सो, यांनी सुचणा दिल्या होत्या. लोणंद पोलीस टाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल वायकर यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकासह घटनास्थळी भेट देवुन तेथे असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तसेच लोणंद शहरात ठिकठिकाणी लावलेल्या सीसीटीव्हीची तपासणी करुन गुन्हे प्रकटीकरण पथकास सुचना दिल्या होत्या. त्याआधारे पो. उप-निरिक्षक गणेश माने व महीला पोलीस उप-निरीक्षक स्वाती पवार तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे गुन्हयातील आरोपी हे पुणे येथील कात्रज व हडपसर या भागातील राहणारे असल्याचे निष्पन्न करून यातील एकास ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने खंडाळा पोलीस ठाण्याचे हद्दीतील बँके मध्ये कॅशची चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलीस अधीक्षक सो. सातारा अजयकुमार बन्सल व उपविभागीय पोलीस अधिकारी सो. फलटण तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल वायकर, पोलीस उप-निरिक्षक गणेश माने, स्वाती पवार, सहा फौजदार पाडवी, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.ना. संतोष नाळे, श्रीनाथ कदम, अभिजित धनवट, केतन लाळगे, अविनाश शिंदे, शिवशंकर तोटेवाड, गोविंद आंधळे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
































