
कराड येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ५६ व्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे मा.नगरसेवक प्रमोद वेर्णेकर, उपतालुका प्रमुख काकासाहेब जाधव, सुनिल पाटील, राजेंद्र माने, विभाग प्रमुख महेश कोळी, अमोल कणसे, नाना पाटसुपे, वाहतूक सेनेचे ज्ञानदेव भोसले, पोपट कांबळे, महेश निकम व शिवसैनिक उपस्थित होते.



















