सातारा जि प . आरोग्य विभागातील भरती मध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झालेली असून, आरक्षण धोरण कायदा २००४ ची पायमल्ली झालेली आहे . सदरच्या पायमल्लीस सातारा जि प . चे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . अनिरुद्ध आठल्ये , डॉ . राधाकृष्ण पवार , डॉ . महेश खलिपे हे जबाबदार असुन सदर प्रकरणी जबाबदारी . निश्चीत करून तिन्ही अधिकाऱ्या वर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत . व प्रशासकीय कारवाई करण्यात यावी . अशी मागणी करणारे निवेदन कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष अजित वाघमारे यांनी मुख्यमंत्री यांचे कडे १३ जुन रोजी दिले होते मुख्यमंत्री महोदयांनी त्याची तात्काळ दखल घेवून राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांना चौकशीचे आदेश दिले . सदरचा राग मनात धरून डॉ . राधाकृष्ण पवार पुणे उपसंचालक यांनी वाघमारे यांचेवर दि .१५ जुन रोजी तात्काळ विभागीय चौकशीचे आदेश कोणत्याही कारणेदाखवा नोटीसे शिवाय दिले आहेत . म्हणजेच काय तर अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर भरती , बदली व प्रतिनियुक्त्या करायच्या आणि त्याची तक्रार जर मागासवर्गीय संघटनानी वरीष्ठ कार्यालयास केली तर तात्काळ संबंधीत संघटना पदाधिकाऱ्यास टार्गेट करायचे हा मुळ स्वभाव डॉ राधाकृष्ण पवार यांचा आहे . याबाबत लवकर डॉ राधाकृष्ण पवार यांना न्यायालयात खेचणार असुन डॉ . राधाकृष्ण पवार ( आरोग्य उपसंचालक पुणे व सह संचालक – हिवताप पुणे ) यांच्या कार्यकालातील भरती , बदली , प्रतिनियुक्ती व इतर बाबी तील अनियमिततेबाबत पुराव्यानिशी कास्ट्राईब च्या माध्यमातून तक्रार दाखल करणार आहोत . अशी माहिती कास्ट्राईबचे सातारा जिल्हाध्यक्ष . अजित वाघमारे यांनी दिली . .