सातारा लोकसभेचे माजी खासदार स्वर्गीय लक्ष्मणराव पाटिल (तात्त्या)यांच्या जयंतीनिमित्त वाठार स्टे येथे शुक्रवारी दि.२५ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. वाठार स्टे येथील आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये माजी खासदार स्वर्गीय लक्ष्मणराव पाटिल (तात्या)यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन सातारा जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रामभाऊ लेंभे,बाळासाहेब सोळस्कर,पोपटराव निकम,मंगेश धुमाळ,पंचायत समितीच्या सभापती शिला झांजूर्णे ,उपसभापती संजय साळुंखे, वाठार स्टेशनच्या सरपंच सौ निता माने, पंचायत समितीच्या सदस्या मंगल गंगावणे, आशीर्वाद हॉस्पिटल चे डॉ. सुयोग लेंभे, डॉ. देवयानी लेंभे, समर्थ मेडिकलचे सुहास जाधव, शामल जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेशराव साळुंखे, राजेंद्र भोसले, नागेश जाधव,उपस्थित होते. यावेळी स्वर्गीय लक्ष्मणराव पाटिल (तात्या) प्रेमी कार्यकर्ते म्हणाले गेली दोन वर्षे कोरोणा काळात रुग्णांची मोठी गैरसोय झाली भविष्यात अशी गैरसोय होऊ नये याकरिता तात्यांच्या नावाने एक सुसज्य हॉस्पिटल व तात्यांचे स्मारक उभारण्यात यावे यावर जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीनकाका पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व तात्या प्रेमी कार्यकर्त्यांना विचारात घेऊन माजी खासदार स्वर्गीय लक्ष्मणराव पाटिल (तात्या) चॅरिटेबल ट्रस्टची उभारणी करून या माध्यमातून सर्व सामान्य जनतेला आरोग्य सेवा मिळाव्यात या उद्देशाने एक सुसज्ज, अत्याधुनिक हॉस्पिटल व याच ठिकाणी स्मारक उभारणी करण्या बाबत निर्णय घेऊ असे अश्वासन दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुयोग लेंभे, तर आभार सुहास जाधव यांनी मानले.