महाराष्ट्र् न्यूज बारामती प्रतिनिधी विनोद गोलांडे
बारामती तालुक्यातील मुरूम व सोमेश्वरनगर परिसर हा सोमेश्वर करखण्याच्या व निरा डावा कालवा लगत असल्याने ऊस बागायत पट्टा अशीच ओळख जिल्ह्यात असताना,तरुण पिढी तरकारी वाल, टोमॅटो, भेंडी, वांगी, गवार,मका, ज्वारी, बाजरी, मका,कलींंगड,टरबूज सह वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या अश्या पिकांकडे वळली आहे. मरूम-सोमेश्वरनगर येथील युवा प्रगतशील शेतकरी अमर बाळासाहेब जगताप यांनी सुमारे चार एकर शेतीत सोयाबीनला न करता चालू वर्षी उडीद पिक घेतले असून उदीड हे पीक तालुक्यासह सोमेश्वरनगर परिसरात प्रथमच घेतले असल्याची चर्चा आहे.
घेतलेले पीक कोणत्याही रोगावीणा दर्जेदार आले असून चांगले उत्पन्न मिळण्याची आशा त्यांना आहे. जवळच असलेला सोमेश्वर साखर कारखाना असून ऊस बागायत पट्टा अशीच ओळख आहे मुबलक पाणी असल्याने परीसरात बहुतांश शेतकरी ऊसाचे उत्पन्न घेतात .
मात्र बारामतीच्या पश्चिम भागातील शेतकरी सध्या सोयाबीन आणि अन्य पिकांना पर्याय शोधत आहेत. जगताप यांनी यासाठी उडीद पिकाची निवड केली आहे.
नांगरणी, काकरणे, पेरणी, बी-बीयाणे, मजूर, औषधफवारणी असा मिळून सुमारे ४५-४६ हजार रुपये खर्च झाला असून प्रति एकर ९ ते १० क्विंटल उडीदचे उत्पन्न निघेल असा अंदाज असून चार एकरात खर्च वजा जाता तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल अशी माहिती अमर जगताप व त्यांचे शेती मार्गदर्शक गणपतराव फरांदे यांनी दिली.सोमेश्वरनगर परीसरात गेल्या दहा वर्षांपासून ऊसाबरोबरच सोयाबीनचे पीकही मोठ्या प्रमाणात घेतले जाते मात्र यावर रोगराईचे प्रमाण वाढत चालल्याने अपेक्षित उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे जगताप यांनी उदीड पीक घेण्याचा निर्णय घेतला असून हे पीक सध्या फुलकळीत आले आहे. सध्या परिसरात सतत होत असलेल्या संततधार पावसामुळे शेतीतील पिकाला पाणी देण्याची आवश्यकता जगताप यांना पडली नाही.
बारामती येथे असणाऱ्या खरेदी विक्री संघाकडून त्यांनी ” उन्नत बीच ” या वाणाचे बीयाणे खरेदी करत आपल्या शेतीत हा आगळावेगळा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. उडीद हे पीक मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. खरीप हंगामात तुरीच्या खालोखाल मूग आणि उडीद ही महत्वाची पीके शेतकरी घेऊ लागली आहेत. निचरा होणाऱ्या जमिनीत ८० ते ९० दिवसात कमी पावसावर हे पिक येत असल्याने आम्ही हा प्रयोग राबविला असल्याची माहिती जगताप आणि फरांदे यांनी दिली. परीसरातील अनेक शेतकरी उडीद पाहण्यासाठी येत असून त्यांनाही या पिका विषयी विषयी मार्गदर्शन केले जात आहे.