सातारा
दुचाकींचे मॉडीफाय सायलेन्सर, कर्णकर्कश हॉर्न, प्रेशर हॉर्न असणाऱ्या वाहन चालकांवरती कारवाई करत आपल्या आवारामध्ये जप्त केलेल्या सायलेन्सरती बुलडोझर फिरवून चक्काचूर करण्याची धडाकेबाज कारवाई सातारा शहर वाहतूक शाखेच्यावतीने करण्यात आली.
यावेळी कारवाई बाबत बोलताना वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत यादव म्हणाले मागील काही दिवसांपासून शहरातील युवक वर्ग रात्री आठ वाजण्याच्या नंतर मोठ्या प्रमाणावरती प्रेशर हॉर्न, कर्णकर्कश हॉर्न, सायलेंन्सर दोन दिवसांपासून सातारा वाहतूक विभागाची दिवस रात्र कारवाई सुरु होती. या कारवाई मध्ये ५६ दुचाकींचे मॉडीफाय सायलेन्सर व, ८ कर्णकर्कश हॉर्न, १० पोलिस सायरन हॉर्न असे आवाज असणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली त्याचबरोबर मद्यपान केलेल्या वाहनचालकांवर सुध्दा कारवाई करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मागील दोन दिवसांपासून शहरातील प्रत्येक चौकात सातारा वाहतूक विभागाची दिवस रात्र मोहिम सुरु होती. या तपासणीमध्ये वाहनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये दुचाकींचे सायलेन्सर आणि कर्णकर्कश हॉर्न यांच्यावर वाहतूक विभागाच्या आवारामध्ये बुलडोझर फिरवण्यात आला. याबाबत सातारा वाहतूक शाखेकडे बऱ्याच दिवसांपासून याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याची दखल घेऊन गेल्या दोन दिवसांपासून शहरांमध्ये दिवस रात्र कारवाई सुरू होत्या. या कारवाईबाबत सातारकरांनी समाधान व्यक्त करत समस्त वाहतूक पोलिसांचे आभार मानले.
वाहतूक शाखेच्या माध्यमातून अशी कारवाई कायम सुरू राहणार आहे अशा या कृत्यांमुळे सातारामधील नागरिकांना त्रास होत असेल वाहतूक शाखा नक्कीच याची दखल घेणार आहे तसेच नियमांचा भंग कोणीही करु नये असे आवाहन शहर वाहतूक शाखेच्यावतीने वाहनचालकांना करण्यात आले आहे.