शांतीचे प्रतीक बुद्ध यांचे विचार न्याय, स्वातंत्र्य,समता व बंधुत्व विश्वाला मिळाले.
पाटण,दि: शांतीचे प्रतीक भ.गौतम बुद्ध यांचे विचार न्याय,स्वातंत्र्य, समता व बंधुत्व हे संपूर्ण विश्वाला मिळाले.असे प्रतिपादन साहित्यिक प्रकाश काशीळकर यांनी केले. भ.गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती त्रिपुडी,ता.पाटण येथील अष्टशील विहाराच्या प्रांगणात विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात संपन्न झाली. तेव्हा बंधुत्व साहित्यरत्न पुरस्कार विजेते प्रकाश काशीळकर प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ट नेते सुनील (आप्पा) वीर होते. काशीळकर म्हणाले, “जयंती, उत्सव व करमणूक – मिरवणूक असल्याचं पाहिजे.करुणा व विद्रोह याचा मिलाप असयालाच हवा.यामधून संघटन होत असते. स्फुल्लिंगमधूनच सामाजिक क्रांतीचे बीज निर्माण होत असल्याने क्रांती घडत असतात. तेव्हा सकारात्मक व विशालदृष्टिकोणातून महामानवांच्या विचारान्वये वाटचाल केली पाहिजे.सन २०१४ ते २०२४ या १० वर्षात क्रांती-प्रतिक्रांती यांचा खेळ चालणार आहे.असे भाकीत करून प्रस्थापितावर भाष्य केले. सध्या शत्रूकडे सत्ता आणि संपत्ती असून त्यांच्यात जागृतीही आहे. त्यामुळे पुढील काळ भयावह आहे. त्यासाठी बहुजनांनी संघटीत झाले पाहिजे.अन्यथा, काळ माफ करणार नाही. कोणत्याही गोष्टींचे नियोजन असावे.वेळेवर तर प्रेम केलेच पाहिजे.अन्यथा, वेळेअभावी अपरिमित हानी होऊ शकते.” डी. सिद्धार्थ म्हणाले, “डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेला, ‘गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ प्रत्येकाच्या घरी असायलाच हवा.बाबासाहेब यांच्या विचारांचे अनुकरणीय लोक निर्माण झाले पाहिजेत.मानवाने शिलाला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे.तरच तो धम्माचे आचरण करण्यास पात्र राहील.” अशापद्धतीने अनेक उदाहणाद्वारे धम्मप्रवचन दिले. त्यांनी गायन व प्रश्नोत्तरे यांचा वापर करून श्रोतावर्गास मंत्रमुग्ध केले. यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त केली.
धवजारोहन प्रल्हाद (भाऊ) वीर यांच्या हस्ते करण्यात आले. महापुरुष यांच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. संपूर्ण विधी कु.आर्या वीर,सौ. शारदा वीर व सौ.नंदा भोळे या उपासीकेसह उपासकांनी सामुदायिक पार पाडला.चंद्रकांत वीर,सिद्धार्थ शिंदे,सौ.वैशाली वीर,सौ.संगीता वीर आदींनी स्वागत करून मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.अनिल वीर यांनी सूत्रसंचालन केले. लोकजीत वीर यांनी प्रास्ताविक व आभारप्रदर्शन केले. सदरच्या कार्यक्रमास सरपंच सौ.नंदाताई भरत पाटील, पो.पाटील सौ.वर्षाराणी दिनकर देसाई,ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र देसाई (तात्या),मिलिंद कांबळे,दिलीप देसाई,अशोकराव जाधव,विजय काळोखे,निवृत्ती मगरे,राजेंद्र जाधव,विजय भंडारे,सुगत कांबळे,सौ.मीना सांगवडकर,सौ.रंजना चाळके, तारुबाई वीर,पुतळाबाई वीर, साळवे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. याकामी, विलास देसाई, भीमराव वीर, चैतन्य वीर, वीर,सागर वीर, नितीन वीर, प्रवीण वीर,संतोष वीर,नथुराम वीर,विजय (आण्णा) वीर, धर्मरक्षित वीर,अनिरुद्ध वीर आदींनी अथक असे परीश्रम घेतले.